कोल्हापूर : ऊस दरावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादात तोडगा काढण्यात अखेर यश आलंय.
एफआरपी व्यतिरिक्त 175 रूपये अधिक दर द्यायला साखर कारखानदार तयार झालेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटनादेखील हा तोडगा स्वीकारण्यास राजी झाल्यात.
राज्याचे महसूल आणि पणनमंत्री चंद्रकांत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील आणि साखर कारखानदारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळं ऊस दराचा तिढा सुटला असून, येत्या 5 नोव्हेंबरपासून ऊसाचा गाळप हंगाम सुरू होणार आहे. मात्र, हा निर्णय केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. हा फॉर्म्युला संपूर्ण राज्यभर राबवावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय.