पुण्यातील १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू

एक धक्कादायक बातमी आहे. पुण्यातील १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. पुण्याच्या कॅम्पभागातील इनामदार कॉ़लेजचे हे विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Feb 1, 2016, 09:31 PM IST
पुण्यातील १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू title=

रायगड : एक धक्कादायक बातमी आहे. पुण्यातील १३ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. पुण्याच्या कॅम्पभागातील इनामदार कॉ़लेजचे हे विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यातील मुरूड समुद्र किनारी १३ जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे. मृतांमध्ये १० तरूणी आणि ४ तरूणांचा समावेश आहे.

आतापर्यंत १४ तरूणांचे मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. आणखी आमच्याबरोबरचे काही विद्यार्थी बेपत्ता असल्याचं काही तरूणांनी सांगितले असल्याने, बेपत्ता तरूण-तरूणींचा शोध सुरू आहे.मदतीसाठी मुरूडकरांनी समुद्र किनाऱ्यावर गर्दी केली आहे. एकूण १३० विद्यार्थी मुरूडला सहलीला गेले होते.

काही विद्यार्थी समुद्रात पोहयला गेले होते. मात्र ओहोटी असल्यामुळं दूरवर पोहायला गेलेले विद्यार्थी पाण्यात ओढले गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. बेपत्ता विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी तटरक्षक दलानं कोस्ट गार्डनं एक वेगवान गस्ती नौका सीजी 117, एक चेटक हेलिकॉप्टर पाठवलंय. तसंच गस्ती नौकाही रवाना करण्यात आल्या आहेत. 

मृत विद्यार्थ्यांची नावे - 

सुप्रिया पाल, शिफा काझी, सुफिया काझी, इफ्तिकार शेख, फरीन काझी, राज तजनी, युसूफ अन्सारी, साजीद चौधरी, शफी अन्सारी, समरीन शेख, स्वप्नाली संगत, सुमैया अन्सारी, रफिया अन्सारी, एक विद्यार्थीनीची ओळख पटली नाही.  चार विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे. 

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली. तसंच जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.