पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार, गणरायाच्या मूर्तींचा अपमान

हिंजवडीजवळ मुळा नदीपात्रात टाकण्यात आलेल्या या हजारो गणेशमूर्ती.. काही मूर्ती पाण्यात बुडालेल्या तर काहींचे अवशेष नदीकाठावर पडलेले… या मूर्ती याठिकाणी आल्या कुठून या प्रश्नाचं उत्तर जितकं धक्कादायक, तितकंच संतापजनक आहे. पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा हा प्रताप आहे.  पुणेकरांनी हौदात तसेच टाक्यांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती पुन्हा नदीच्या स्वछ पाण्यात टाकण्यात आल्या आहेत. रात्रीच्या अंधारात नदीवरील पुलाचा कठडा तोडून मूर्तींनी भरून आणलेले डंपर्स नदी पात्रात रिकामे करण्यात आले आहेत.  

Updated: Sep 30, 2015, 04:03 PM IST
पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार, गणरायाच्या मूर्तींचा अपमान   title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: हिंजवडीजवळ मुळा नदीपात्रात टाकण्यात आलेल्या या हजारो गणेशमूर्ती.. काही मूर्ती पाण्यात बुडालेल्या तर काहींचे अवशेष नदीकाठावर पडलेले… या मूर्ती याठिकाणी आल्या कुठून या प्रश्नाचं उत्तर जितकं धक्कादायक, तितकंच संतापजनक आहे. पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा हा प्रताप आहे.  पुणेकरांनी हौदात तसेच टाक्यांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती पुन्हा नदीच्या स्वछ पाण्यात टाकण्यात आल्या आहेत. रात्रीच्या अंधारात नदीवरील पुलाचा कठडा तोडून मूर्तींनी भरून आणलेले डंपर्स नदी पात्रात रिकामे करण्यात आले आहेत.  

महापालिका तसंच पर्यावरण प्रेमींच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणेकरांनी त्यांच्या गणेश मूर्ती हौदात तसंच टाक्यांमध्ये विसर्जित केल्या होत्या. नदीपात्रात विसर्जनासाठी पाणी सोडलं असताना मानाच्या मंडळांसह लाखो पुणेकरांनी आपल्या मूर्ती स्वत:हून हौदात विसर्जित केल्या. तब्बल १ लाख ३२ हजार मूर्तीचं त्यात विसर्जन झालं होतं. विसर्जनानंतर या मूर्ती वाघोली जवळ एका खाणीत सन्मानपूर्वक टाकण्यात येतील, असं महापालिकेनं सांगितलं होतं, असं असताना त्यापैकी काही मूर्ती पुन्हा नदीच्या पाण्यात सोडण्यात आल्या आहेत. नदी पात्रात गणेश मूर्तींच्या विसर्जनाला सुरुवातीपासूनच विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता पुन्हा एकदा महापालिकेच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते असिम सरोदे यांनी दिलाय.

आणखी वाचा - पुण्यातील मानाच्या गणपतींचे होणार हौदात विसर्जन

गणेश मूर्तीचं नदीपात्रातील विसर्जन टाळण्यासाठी महापालिकेनं १४४ हौद बांधले होते. नदी प्रदूषण टाळून पर्यावरण रक्षण साधण्यासाठी जनजागरण मोहीम राबवण्यात आली होती. सुज्ञ पुणेकरांनी ती यशस्वी करून दाखवली. मात्र महापालिका प्रशासनाच्या कृत्यामुळं या मोहिमेच्या उद्देशालाच तडा गेलाय. महापालिका कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात केलेल्या कारनाम्याचा बोभाटा झाल्यानंतर संबंधितांवर कारवाईचे आदेश महापौरांनी दिले आहे. 

पाहा व्हि़डिओ - 

 
संबंधितांवर कारवाई करण्याबरोबरच नदीपात्रात टाकण्यात आलेल्या गणेश मूर्ती पुन्हा योग्य ठिकाणी नेवून टाकणं आवश्यक आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याची जी सद्बुद्धी पुणेकरांना लाभली ती महापालिका प्रशासनाला लाभली नसल्याचं या घटनेतून अधोरेखित झालंय. पुढल्या वर्षी तरी त्यांना ती लाभो अशी श्री. गणेशाकडे प्रार्थना…. 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.