पुण्‍यात हेल्‍मेटसक्‍तीला वाढता विरोध

पुण्‍यात हेल्‍मेटसक्‍तीला विरोध वाढतच चालला आहे. पुण्याचे महापौर आणि उपमहापौरही हेल्‍मेटसक्‍तीच्या विरोधात रस्‍त्‍यावर उतरले. 

Updated: Nov 16, 2014, 10:24 PM IST
पुण्‍यात हेल्‍मेटसक्‍तीला वाढता विरोध  title=

पुणे : पुण्‍यात हेल्‍मेटसक्‍तीला विरोध वाढतच चालला आहे. पुण्याचे महापौर आणि उपमहापौरही हेल्‍मेटसक्‍तीच्या विरोधात रस्‍त्‍यावर उतरले. 

पुण्‍यातल्‍या महात्मा फुले मंडईत सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन केलं. महापौर दत्‍तात्रय धनकडवडे, उपमहापौर आबा बागूल आंदोलनात सहभागी झाले होते. 

भाजपचे आमदार विजय काळे, मेधा कुलकर्णी यांनी देखील प्रत्यक्ष सहभागी होऊन आंदोलनला पाठिंबा दिला.  'पुण्‍यातली हेल्‍मेटसक्‍ती रद्‍द करा' अशी सर्वपक्षीय नेत्‍यांनी पोलीस आयुक्‍तांकडे मागणी केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.