प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याच्या पायथ्याशी हायप्रोफाईल पार्टी करणाऱ्या ठिकाणावर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कारवाई केलीय. या कारवाईत ५ मुलींना आणि ९ जणांना पोलिसांनी अटक केलीय.
अटक करण्यात आलेली सर्व पुरूष व्यावसायिक असून कर्नाटकातील बांधकाम कंत्राटदार आहेत. पन्ह्याळ्याच्या परिसरात पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आरोपींना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.
अशाप्रकारच्या हायप्रोफाईल पार्ट्या सर्रास होतांना दिसतायेत. पन्हाळासारख्या ठिकाणी अशा घटनेमुळं खळबळ माजलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.