पावसाचा दणका : वीजपुरवठा खंडीत, धुळे शहर अंधारात

शहरात काल जोरदार पाऊस झाला. वादळी पावसाचा तडाखा बसल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. त्यामुळे अर्धे धुळे शहर अंधारात होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 13, 2017, 11:48 AM IST
पावसाचा दणका : वीजपुरवठा खंडीत, धुळे शहर अंधारात title=

धुळे : शहरात काल जोरदार पाऊस झाला. वादळी पावसाचा तडाखा बसल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. त्यामुळे अर्धे धुळे शहर अंधारात होते.

काल सांयकाळी झालेल्या अवकाळी पाऊसानंतर वीजपुरवठा खंडीत झाल्याने बत्ती गुल झाली. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती, पेठ विभाग, जुने धुळे परीसरासह अनेक ठिकाणी गेल्या बारा तासापासून वाज पुरवठा खंडीत आहे. 

यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. काम सुरू असल्याचे वीज कंपनीकडून धातुरमातुर उत्तर देण्यात येत आहे.