'रायपेन' जगातील पहिली 'प्रोशल' वेबसाइट!

सोशल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही नेटवर्किंग साईटच्या सुविधा एकाच वेबसाईटच्या माध्यमातून मिळल्या तर... होय आता हे शक्य आहे. पुण्यातील काही इंजिनिअर तरुणांनी एकत्र येऊन प्रोशल ही संकल्पना राबविणाऱ्या रायपेन या वेबसाईट ची निर्मिती 

Updated: Feb 5, 2015, 12:56 PM IST
'रायपेन' जगातील पहिली 'प्रोशल' वेबसाइट! title=

पुणे: सोशल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही नेटवर्किंग साईटच्या सुविधा एकाच वेबसाईटच्या माध्यमातून मिळल्या तर... होय आता हे शक्य आहे. पुण्यातील काही इंजिनिअर तरुणांनी एकत्र येऊन प्रोशल ही संकल्पना राबविणाऱ्या रायपेन या वेबसाईट ची निर्मिती 

गेल्या काही वर्षात सोशल नोटवर्किंग बरोबरचं प्रोफेशनल नेटवर्टिंक साईट्चा वापरही वाढलाय. त्यामुळे मित्रांबरोबर चॅटिंग करण्यासाठी सोशल नेटवर्किंग आणि व्यावसायिक ओळखींसाठी प्रोफेशनल नेटवर्किंग अशा दोन वेबसाईवर अकाऊंट काढावं लागतं. आता मात्र प्रोशल या संकल्पनेव्दारे सोशल-प्रोफेशनल अशा दोन्ही सर्कल मधल्या लोकांशी एकाच अकाऊंट वरुन कनेक्टेड राहता येणारेय. एवढचं नाही तर हे करताना आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रोफाईल वेगळं ठेवण्याची सुविधाही देण्यात आलीये. त्यामुळं नेटिझेन्सला एकाच अकाऊंटवर वैयक्तिक आणि व्यावसायिक माहिती वेगळी ठेवता येऊ शकते.

प्रोशल मुळे रायपेन ही वेबसाईट इतर वेबसाईटस पेक्षा वेगळी नक्कीच आहे. मात्र त्या बरोबरच ई गव्हर्नन्स.. स्पिक अप या सारखे अनेक नवीन फिचर्स देखील या वेबसाईटमध्ये देण्यात आलेले आहेत. नोटिफिकेशन्स वाचायला जर वेळ नसेल तर नेटिझेन 'स्पिक अप'च्या माध्यमातून आपल्या नोटिफिकेशन्स ऐकू शकतात.

सध्या बिटा प्रकारात हे संकेतस्थळ सुरु असुन केवळ इनव्हिटेशन दिलेल्याच नेटिझेन्सना वेबसाईटवर लॉगिन करता येणार आहे. मात्र पुढील दोन महिन्यात ही वेबसाईट सर्वांसाठी खुली होणारेय. सोशल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही गटांशी एकाच वेळी कनेक्टेड ठेवणारी रायपेन ही जगातील पहिलीच प्रोशल वेवसाईट ठरणारेय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.