राज ठाकरे पुन्हा दौऱ्यावर, नजरा नाशिककडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवसीय नाशिक दौ-यावर आहेत. दौ-याच्या सुरुवातीला त्यांनी अर्चना जाधव या नगरसेविकेच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं.

Updated: Nov 28, 2014, 07:43 PM IST
राज ठाकरे पुन्हा दौऱ्यावर, नजरा नाशिककडे title=

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवसीय नाशिक दौ-यावर आहेत. दौ-याच्या सुरुवातीला त्यांनी अर्चना जाधव या नगरसेविकेच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं.

काही दिवसांपूर्वी अर्चना यांचे पती संजय यांचं डेंग्यूनं निधन झालं होतं. त्यानंतर राज यांनी नाशिक पालिका आयुक्तांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज यांचा हा पहिलाच दौरा आहे. या दौ-यात राज मनसेच्या कार्यकर्त्यांच्याही भेटीगाठी घेतील.

विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे तिन्ही आमदारांचा पराभव झाला होता. निवडणुकीनंतर राज यांचा नाशिक दौरा नियोजित होता. मात्र मुलीच्या अपघातानंतर हा दौरा रद्द करावा लागला होता. या पराभवानंतर वसंत गिते, अतुल चांडक यांच्यासह अनेक मनसे पदाधिका-यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिलाय. त्यामुळं राज यांच्या या दौ-यात हे नेते उपस्थित राहतील का याकडं सा-यांच्या नजरा लागल्यात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.