पुणे : एरवी मला तुमच्याशी बोलायचंय, म्हणत मनसैनिकांसमोर भाषण देणारे राज ठाकरे आज मनसैनिकांना ऐकण्यास उत्सुक आहेत.
विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच पुणे दौ-यावर आलेत. आपल्या चार दिवसांच्या मुक्कामात राज ठाकरे पुण्यातले कार्यकर्ते तसंच पदाधिका-यांच्या भावना जाणून घेतायत
लोकसभा तसंच विधानसभेतल्या पराभवानंतर पुण्यासह राज्यातल्या मनसैनिकांमध्ये एक प्रकारची मरगळ आलीय. पक्ष संघटनेत अस्वस्थता आणि अस्थिरतेचं वातावरण आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही परिस्थिती बदलणं आवश्यक आहे. त्यासाठी राज ठाकरे स्वत: पुण्यात दाखल झालेत.
त्यातच सोमवारी स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या निमित्तानं राज आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे एकत्र आल्याने अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलंय. कार्यकर्त्यांमध्येही नवा उत्साह संचारलाय. अशा परिस्थितीत राज यांच्या पुणे दौ-यातून काय साधलं जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. पुण्यामध्ये राज यांच्या राजमहाल या निवासस्थानी बैठकीचा सिलसिला सुरूय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.