सदाभाऊंच्या भाजप प्रवेश चर्चांवर राजू शेट्टींची प्रतिक्रिया...

'जोपर्यंत सदाभाऊंच्या छातीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लाल बिल्ला आहे तोपर्यंत चिंतेचं कारण नाही' अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांना ब्रेक लावलाय.  

Updated: Feb 17, 2017, 06:52 PM IST
सदाभाऊंच्या भाजप प्रवेश चर्चांवर राजू शेट्टींची प्रतिक्रिया...  title=

सांगली : 'जोपर्यंत सदाभाऊंच्या छातीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लाल बिल्ला आहे तोपर्यंत चिंतेचं कारण नाही' अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांना ब्रेक लावलाय.  

'गळ्यात कसलीही पट्टी असली तरी जोपर्यंत सदाभाऊंच्या छातीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लाल बिल्ला आहे तोपर्यंत सदाभाऊंनाही काही चिंता करायचं कारण नाही आणि इतरांनाही चिंतेचं कारण नाही... गळ्यात भाजपचं उपरणं घातलं म्हणून काही चर्चा असली तरी मला मात्र त्याची चिंता नाही... शेतकऱ्यांना चिंता नाही... मग राजकीय वर्तुळाला का चिंता पडली आहे' अशी प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिलीय. 

गुरुवारी भाजपच्या एका सभेत मंत्री सदाभाऊ खोत यांचा छातीवरचा लाल बिल्ला भाजपच्या उपरण्याखाली झाकलेला दिसला होता... त्यावरून सुरू झालेल्या विविध चर्चांवर राजू शेट्टींनी ही प्रतिक्रिया दिलीय. 

राजू शेट्टी यांनी खोतांच्या मुलाच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरू होती... त्यामुळे खोत यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांणा उधाण आलं होतं.

दरम्यान, भाजमधल्या प्रवेशाबाबत निवडणुकीनंतर निर्णय घेऊ, अशी सावध प्रतिक्रिया राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलीय. यावेळी, भाजपचा स्कार्फ गळ्यात घातल्याचा वेगळा अर्थ काढू नये असंही त्यांनी नमूद केलंय.