पुणे : ब्राह्मण समाजाला आरक्षण नसल्याने ते परदेशात जात असतील तर, त्यांनी आरक्षण घ्यावे, इथेच रहावे अशी प्रतिक्रिया रिपाई नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावर दिलीय.
तर नारायण राणेंच्या भाजपाप्रवेशावरून राणेंनी भाजपात येण्याचा लवकर निर्णय घ्यावा, फार उशीर करु नये असा मित्रत्वाचा सल्ला त्यांनी राणेंना दिला आहे. ब्राह्मण मुलांना आरक्षण नसल्यामुळे तर परदेशात जातात असं वादग्रस्त वक्तव्य पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलं होतं.