अहमदनगर येथे रॉडने मारहाण केलेल्या रामेश्वरचा मृत्यू

जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर गावात पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात रामेश्वर महाले या युवकाच्या डोक्यात रॉडने मारहाण केल्याने मृत्यू झाला. या मारहाणीत जखमी झालेल्या एका युवकावर उपचार सुरु आहेत. 

Updated: Jan 30, 2016, 04:18 PM IST
अहमदनगर येथे रॉडने मारहाण केलेल्या रामेश्वरचा मृत्यू title=

अहमदनगर : जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर गावात पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात रामेश्वर महाले या युवकाच्या डोक्यात रॉडने मारहाण केल्याने मृत्यू झाला. या मारहाणीत जखमी झालेल्या एका युवकावर उपचार सुरु आहेत. 

युवकाचा खून झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झालेय. जातीय तणाव वाढू नये म्हणून शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. बेलापुरातील संभाजी चौकात मयत रामेश्वर महाले आणि जखमी राकेश नागले यांना भांडण मिटवून घेवू म्हणून बोलवण्यात आलं होतं. 

मात्र, आठ ते दहा जणांच्या समूहानं चौकात आलेल्या महालेच्या डोक्यात लाकडी दांडके आणि रॉडने मारहाण केली. उपचारादरम्यान रामेश्वर महालेचा मृत्यू झालाय.