नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या गणेश नाईक कुटुंबातील नणंद भावजय यांच्या लढतीत अखेर नणंद वैशाली म्हात्रे हिने विजय मिळवला.
भाजपकडून लढणाऱ्या वैभव नाईक यांच्या पत्नी वैष्णवी नाईक यांना राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक रिंगणात असलेल्या सख्ख्या नणंद वैशाली म्हात्रे यांनी दे धक्का दिला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुतणे वैभव नाईक भाजपमध्ये आहेत. प्रभाक क्र. ५१ मधून वैभव यांच्या पत्नी वैष्णवी यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली, तर वैभव यांची सख्खी बहीण वैशाली म्हात्रे राष्ट्रवादीतर्फे याच प्रभागातून रिंगणात होत्या. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.