पतीला चाकूचा धाक दाखवून तिघांचा पत्नीवर बलात्कार

रात्रीच्या वेळी रिक्षातून जातांना पतीला चाकूचा धाक दाखवून, तीन नराधमांनी एका 19 वर्षीय नवविवाहीतेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीये... 

Updated: Aug 31, 2016, 06:48 PM IST
 पतीला चाकूचा धाक दाखवून तिघांचा पत्नीवर बलात्कार title=

देगलूर : रात्रीच्या वेळी रिक्षातून जातांना पतीला चाकूचा धाक दाखवून, तीन नराधमांनी एका 19 वर्षीय नवविवाहीतेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीये... 

नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातल्या मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला... पिडीत विवाहीता नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील रहिवासी आहे... 

सोमवारी 29 ऑगस्ट रोजी रात्री देगलुर तालुक्यातील मरखेल बस स्थानकावरून  हे दोघे गावाकडे जाण्यासाठी रिक्षात बसले. या रिक्षातत आधीच दोन जण बसले होते... 

मरखेल - सावळी रस्त्यावर निर्मनुष्य ठिकाणी आरोपींनी रिक्षा थांबवून विवाहितेच्या पतीला चाकूचा धाक दाखवला... आणि विवाहितेला बाजुच्या झुडपात नेऊन तिघांनी आळीपाळीने तब्बल पाच तास तिच्यावर अत्याचार केले...  नंतर पतीच्या खिशातील पैसे काढुन तिघेही फरार झाले... 

30 ऑगस्टला संध्याकाळी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली... मरखेल पोलीसांनी तातडीने ऑटो चालक अनिल जाधव, त्याचे साथीदार लक्ष्मण चामलवाड आणी मकसूद या तीघांना अटक केली... 

आरोपींवर बलात्कार , लुटमार आणी अ‍ॅट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय... या सामूहिक बलात्काराच्या घटनेने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडालीये...