नाशिक : जिल्ह्यात रेशनिंगवरील साखर, गहू, तांदूळ हे धान्य परस्पर विकल्याप्रकरणी ७ तहसिलदार आणि ६ कर्मचारी यांना निलंबित करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी विधान परिषदेत केली.
उपसचिव पातळीवर समिती नेमून या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं बापट यांनी जाहीर केलं. एवढंच नव्हे तर ठेकेदार संगनमतानं हा गैरव्यवहार करत असल्यानं त्यांच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एकूण ३१ हजार क्विंटल धान्याचा हा घोटाळा आहे, १५ जणांविरोधात एकत्र कारवाई होण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे. रेशनिंग धान्याची कशी अफरातफर होते, याचा पर्दाफाश 'झी मीडिया;नं बुधवारी केला होता. गिरीश बापट यांनी 'झी मीडिया'च्या त्या बातमीचा उल्लेखही विधान परिषदेत उत्तर देताना केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.