औरंगाबादेत सेना-भाजपला बंडखोरीचा फटका

औरंगाबादेत शिवसेना भाजप यांची युती झाली असली तरी अनेक वार्डात दोन्ही पक्षांचे बंडखोर आमनेसामने उभे ठाकले आहे. तर काही ठिकाणी त्या त्या पक्षातील नाराजांनीच त्यांच्याच पक्षासमोर आव्हान उभं केलं आहे, यामुळं युतीलाच फटका बसण्याची शक्यता आहे. 

Updated: Apr 13, 2015, 06:59 PM IST
औरंगाबादेत सेना-भाजपला बंडखोरीचा फटका title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादेत शिवसेना भाजप यांची युती झाली असली तरी अनेक वार्डात दोन्ही पक्षांचे बंडखोर आमनेसामने उभे ठाकले आहे. तर काही ठिकाणी त्या त्या पक्षातील नाराजांनीच त्यांच्याच पक्षासमोर आव्हान उभं केलं आहे, यामुळं युतीलाच फटका बसण्याची शक्यता आहे. 

दोन्ही पक्षांतील नेते बंडखोरांना शांत करू कारवाई करू असे सांगत असले तरी काही नेत्यांचीच बंडखोरांना फूस असल्याचं सांगण्यात येतय. 

अखेर अनेक बैठकांनतर शिवसेना भाजपची युती झाली मात्र नाराज कार्यकर्त्यांनी बंडखोरी करीत पक्षासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे आणि याचा फटका आता युतीलाच बसणार आहे.

नेत्यांनी बंडखोरी शमवण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही त्यामुळं आता बंडखोरांना मतदानाआधी शांत करण्याचं मोठं आव्हान या दोन्ही पक्षांसमोर आहे.. 

पाहूयात कुठं बसणार बंडखोरीचा फटका

गुलमंडी वार्ड क्रं 48 शिवसेनेला सुटला आहे. या ठिकाणी खासदाच चंद्रकांत खैरै यांचा पुतण्या सचिन खैरै उमेदवार आहे,  याठिकाणी भाजप नेते किशनचंद तनवाणी यांचा भाऊ राजू तनवाणी यांनं बंडखोरी केली आहे, तर शिवसेनेतून नाराज असलेले पप्पू व्यास हे सुद्धा रिंगणात आहेत..

खडकेश्वर वार्डात शिवसेनेच्या सुगंधीकुमार गढवे यांच्यासमोर भाजपच्या कुणाल खरात यांनी बंडखोरी केली आहे.

गणेशनगर वार्ड म्हणजे शिवसेनेचा गड, या ठिकाणी विद्यान नगरसेविका प्राजक्ता भाले यांना डावलून शिवसेनेनं मकरंद कुळकर्णी यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळं भाले यांच्या पतीनं बडखोरी करीत अर्ज भरलाय..

एमआयडीसी चिखलठाणा वार्डातून भाजपानं विद्यमान नगरसेवक राजू शिंदे यांनाच उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या विरोधात भाजप आमदार नारायण कुचे यांचे बंधू किशोर कुचे हे अपक्ष म्हणून लढताय. महत्वाचे म्हणजे नारायण कुचे हे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे निकटवर्तीय आहेत.

गुलमोहर कॉलनीत भाजपानं शिवाजी दांडगे यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात शिवसेनेचे सुधीर लुंगारे यांनी दंड थोपटले आहे..  तर विनोद तावडे समर्थक संजीव खर्डीकर यांनी सुद्धा अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे..

अविष्कार कॉलनी वार्डात शिवसेनेनं सोपान बांगर यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्याविरोधात शिवसेनेचेच कृष्णा माडगूळकर आणि भाजपच्या मयूर वंजारी यांनी आव्हान उभं केलं आहे.
स्वामी विवेकानंद वार्डातून  शिवसेनेच्या सीमा खरात यांच्या विरोधात शिवसेनेच्याच मनिषा कांबळे उभ्या ठाकल्या आहेत..

महापौर कला ओझा शिवसेनेकडून बाळकृष्ण नगरमधून रिंगणात असताना त्यांच्या विरोधात भाजपच्या संगिता रत्नपारखी यांनी बंड केले आहे.. त्या आमदार अतुल सावेंच्या जवळच्या आहेत..
शिवनेरी कॉलनीतून शिवसेनेच्या ज्योती पिंजरकर यांना भाजपच्या सोनाली सातदिवे यांनी आव्हान दिले आहे.. सातदिवेंना तनवाणी यांची समर्थन असल्याचं माहिती आहे.

पदमपुरा वार्डातून शिवसेनेनं संजय बारवाल यांना तिकीट दिलं आहे तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचेच्या  माजी महापौर गजानन बारवाल यांनीच बंड केले आहे..

ज्या ठिकाणी शिवसेनेविरोधात भाजपानं बंडखोरी केली आहे त्या ठिकाणी भाजप सभा घेणार असं खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सांगताय.. तर शिवसेना बंडखोरांची हकालपट्टी करणार असे संकेत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले आहेत.. 

अनेक बंडखोरांना दोन्ही पक्षातीन नेत्यांचा मोठा पाठिंबा आहे त्यामुळं येणा-या काळात ही बंडखोरी शमली नाही तर युतीला फटका नक्की बसणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही..
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.