असा क्लायमेक्स तुम्ही हिंदी चित्रपटातही पाहिला नसेल

 अंगावर शहारे आणणारी घटना सांगली जिल्ह्यातील हिवरे गावात घडली. बहिणीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी भाऊ त्या गावात पाच वर्षानंतर गेला, मात्र निर्दोष दोन महिलांचा खून करून आला.  ही घटना सांगली जिल्ह्यातील हिवरे गावात घडली. 

Updated: Jun 23, 2015, 04:18 PM IST
असा क्लायमेक्स तुम्ही हिंदी चित्रपटातही पाहिला नसेल title=

सांगली :  अंगावर शहारे आणणारी घटना सांगली जिल्ह्यातील हिवरे गावात घडली. बहिणीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी भाऊ त्या गावात पाच वर्षानंतर गेला, मात्र निर्दोष दोन महिलांचा खून करून आला.  ही घटना सांगली जिल्ह्यातील हिवरे गावात घडली. 

असा क्लायमेक्स तुम्ही हिंदी चित्रपटातही पाहिला नसेल
या घटनेतील आणखी एक महिला गंभीर जखमी आहे. या प्रकरणातील तिन्ही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत निर्दोष महिलांचा खून कसा झाला हा सुरूवातीला प्रश्न होता, पहिल्यांदा तर खुनामागचं कारणचं कळत नव्हतं. 

तुमचा राग निर्दोष लोकांचा जीव घेऊ शकतो
खानापूर तालुक्यातील धोंडेवाडी येथील सुधीर घोरपडेची बहीण विद्या हिचा विवाह हिवरे येथील बळवंत शिंदेशी झाला होता. २००९ मध्ये विद्याने विष पिऊन आत्महत्या केली होती. यानंतर विद्याच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्या पाच व्यक्तींविरोधात घातपाताचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल केला.

बहिणीला न्याय मिळाला नाही, मात्र दुसऱ्या दोन निर्दोषांवर अन्याय झाला
सासू-सासऱ्यावरील या खटल्याचा नुकताच निकाल लागला. यात विद्याच्या सासू-सासर्‍यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले. त्यामुळे बहिणीला न्याय मिळाला नाही, याचा सुधीरच्या मनात राग होता.

बदला घेण्याचा निश्चय केला, पण...
सूडाच्या भावनेने त्याने बहिणीच्या सासरच्या सर्व मंडळींना संपवण्याचा निश्चय केला. रविवारी सकाळी त्याने मित्र रवींद्र कदम आणि अजय शिंदे यांच्या सहकार्याने हा निर्धार तडीस नेण्यासाठी हिवरे गाठले. 

पाच वर्षानंतर तो गावात आला
सुधीरने पाच वर्षांपूर्वी बहिणीचे घर पाहिले होते. सुधीर आपल्या दोन साथीदारांसह विद्याच्या शेतातील घराजवळच्या ब्रह्मदेव शिंदे यांच्या घरात शिरला आणि ब्रह्मदेव यांची पत्नी प्रभावती, लग्न झालेली मुलगी सुनीता पाटील आणि सून निशिगंधा यांच्यावर चाकूने वार केले. यात प्रभावती आणि सुनीता यांचा जागीच मृत्यू झाला. 

नंतर कळलं ते भयानक वास्तव
हिवरे गावात पाच वर्षानंतर येऊन, ज्या घरात सुधीर आणि त्याच्या दोन साथीदारांनी दोन महिलांचा खून केला, त्या घरात बहिणीचे सासरे नाही, तर दुसरंच कुटुंब राहत होतं,  आणि त्याने त्या कुटुंबातील दोन महिलांना ठार मारलं, आणि एक गंभीर जखमी आहे. कारण आपली बहिण विद्याचे सासरे शेतातील घर सोडून गावात राहायला आले होते, याची  कल्पनाच सुधीरला नव्हती. 

सुधीरचा राग अनावर झाला, त्याने बहिणीवरील अन्याय दूर करण्याचा नको तो चंग बांधला, पण त्याने दुसऱ्याची आई, मुलगी, पत्नी, बहिणही हिरावून नेली.या हल्ल्यातील एक महिला, निशिगंधा गंभीर जखमी आहे, निशिगंधा यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पसार झालेल्या सुधीरसह त्याच्या दोनही साथीदारांना पोलिसांनी तासगाव येथून अटक करण्यात आलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.