पुणे : सैराट चित्रपटामुळे सगळ्यांनाच वेड लागलं आहे. या चित्रपटातल्या परशा आणि आर्चीचे राज्यभरामध्ये बरेच फॅन तयार झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमधल्या आर्चीच्या फॅननं तिला भेटण्यासाठी चक्क घरफोडी केली आहे.
आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूच्या मुळ गावी अकलुजला जाऊन तिला भेटण्यासाठी एका अल्पवयीन मुलानं घरफोडी केली आहे. घरफोडीनंतर त्याला 35 हजार रुपये मिळाले, आणि हकीम शफीक शेख या 20 वर्षांच्या मित्राबरोबर त्यानं अकलूज गाठलं. आर्चीच्या शाळेबाहेर ते उभे राहिले आणि त्यांना आर्चीला पाहायला मिळालं.
आर्चीला पाहण्यासाठी दरोड्यातल्या 35 हजारांपैकी 20 हजार रुपये खर्च झाले, पण आर्चीला भेटल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. चोरीचा तपास करत असलेल्या वाकड पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची रवानगी आता बालसुधारगृहामध्ये करण्यात आली आहे.