लय भारी रितेश देशमुख, दुष्काळग्रस्तांच्या मदतीला

राज्यातील दुष्काळाचे चटके सामान्यांना बसत आहेत. त्यांच्या मदतीसाठी स्टार मंडळी धाऊन येत आहेत. आता यात अभिनेता रितेश देशमुख याच्या नावाची भर पडली आहे.  

Updated: Apr 23, 2016, 07:37 PM IST
लय भारी रितेश देशमुख, दुष्काळग्रस्तांच्या मदतीला title=

मुंबई : राज्यातील दुष्काळाचे चटके सामान्यांना बसत आहेत. त्यांच्या मदतीसाठी स्टार मंडळी धाऊन येत आहेत. आता यात अभिनेता रितेश देशमुख याच्या नावाची भर पडली आहे. याआधी अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अक्षय कुमार, खेळाडू अजिंक्य राहाणे, सचिन तेंडुलकर मदतीसाठी पुढे आलेत.

कोण करीत आहे मदत?

रितेश देशमुख याने लातूरच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी २५ लाख रूपयांचा निधी दिला आहे. रितेशच्या या मदतीमुळे लातुरकरांना दिलासा मिळालाय. राजकीय पक्षांपैकी शिवसेना आणि मनसे यांनीही आपल्या परीने मदत करीत आहेत. तर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी 'नाम' संस्था स्थापन करुन मदतीचा विडा उचलाय. तर अक्षय कुमारने आधी ९० लाख नंतर ५० लाखांची मदत करण्यासाठी आपला हात पुढे केला. आता रितेश देशमुखने २५ लाख रुपयांचा निधी दिलाय.

पाणी फाऊंडेशन

तर राज्यातील दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी अभिनेता आमिर खान आणि लेखक- दिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांनी पुढाकार घेतलाय. त्यादृष्टीने ‘पाणी फाऊंडेशन’मार्फत राज्यभरात गावागावात जाऊन जलसंधारणाची काम करण्यात येत आहेत. या उपक्रमाशी सचिन तेंडुलकर, रतन टाटा यासारख्यांनी सहभाग घेतलाय.