राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जाळं देशात वेगाने वाढतंय

गेल्या ५ वर्षात संघाच्या शाखांमध्ये ३३ % तर गेल्या ५ महिन्यात हीच वाढ तब्बल ५,१३१ आहे. महत्वाचे म्हणजे संघाच्या या वाढीत तरुण पिढीचं मोठं योगदान आहे. 

Updated: May 25, 2017, 10:14 AM IST
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जाळं देशात वेगाने वाढतंय title=

नागपूर : देशाच्या काना-कोप-यात स्वयंसेवकांचं जाळं उभं करण्याचा प्रयत्न करणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रयत्नांना चांगलंच यश मिळतंय. संघाच्या शाखांमध्ये गेल्या ५ वर्षात कमालिची वाढ झाली आहे. 

गेल्या ५ वर्षात संघाच्या शाखांमध्ये ३३ % तर गेल्या ५ महिन्यात हीच वाढ तब्बल ५,१३१ आहे. महत्वाचे म्हणजे संघाच्या या वाढीत तरुण पिढीचं मोठं योगदान आहे. 

संघाच्या स्थापनेला २०२५ मध्ये १०० वर्ष पूर्ण होत असताना देशात संघाच्या १ लाख शाखा स्थापित करण्याचा मानस आहे. मागील वर्षी गणवेशात झालेल्या बदलामुळे ही वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जातेय.