नागपूरमध्ये वाहन खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

बीएस-3 इंजिन असलेल्या वाहन खरेदीसाठी नागपूरमध्येही ग्राहकांची झुंबड पाहायला मिळाली. सकाळपासूनच इथं वाहन खरेदीसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय. त्यामुळे डीलरकडे बीएस-3 वाहनांचा स्टॉकं संपलाय. 

Updated: Mar 31, 2017, 03:33 PM IST
नागपूरमध्ये वाहन खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड  title=

नागपूर : बीएस-3 इंजिन असलेल्या वाहन खरेदीसाठी नागपूरमध्येही ग्राहकांची झुंबड पाहायला मिळाली. सकाळपासूनच इथं वाहन खरेदीसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय. त्यामुळे डीलरकडे बीएस-3 वाहनांचा स्टॉकं संपलाय. 

'बीएस-३ नो स्टॉक' चे बोर्ड शोरुमबाहेर लावण्यात आलेत. बीएस-3 वाहन विक्रीवर सुप्रीम कोर्टाने घातलेल्या बंदीनंतर वाहन विक्रेत्यांकडून या वाहनांवर बंपर सूट देण्यात आलीय. त्यामुळे बीएस-३ वाहनं डीलरकडे आऊट ऑफ स्टॉक झालीत.

बीएस-3 दुचाकींवर पाच हजारापासून 20 हजारापर्यंत तर कारवर 70 हजारापर्यंतची सूट देण्यात आलीय. त्यामुळे देशभरातील सर्व दुकानात ग्राहकांची अशीच गर्दी पाहायला मिळतेय.