संजय दत्तला १४ दिवसांची कैदी रजा मंजूर

अभिनेता आणि कैदी संजय दत्त याला १४ दिवसांचा फरलो म्हणजेच कैदी रजा मंजूर झाली आहे. त्यामुळे यंदा संजय दत्त नवीन वर्षांच स्वागत आपल्या कुटुंबीयांसोबत आणि मित्र मंडळींत सोबत करणार आहे.

Updated: Dec 23, 2014, 11:09 PM IST
संजय दत्तला १४ दिवसांची कैदी रजा मंजूर title=

पुणे : अभिनेता आणि कैदी संजय दत्त याला १४ दिवसांचा फरलो म्हणजेच कैदी रजा मंजूर झाली आहे. त्यामुळे यंदा संजय दत्त नवीन वर्षांच स्वागत आपल्या कुटुंबीयांसोबत आणि मित्र मंडळींत सोबत करणार आहे.

संजय दत्त याचा हा फर्लो पुणे डिव्हिजनल कमिश्नर यांनी मंजूर केलाय. ठराविक दिवस जेलमध्ये काम केल्यानंतर कैद्याला १४ दिवसांकर्ता फर्लोवर सोडण्यात येत. याआधि मान्यता दत्त हिच्या ब्रेन ट्युमरच्या शस्त्रक्रिये वेळी ३० दिवसांची पॅरोल आणि नंतर पुन्हा याच कारणासाठी १४ फर्लो संजय दत्तला देण्यात आला होता.

पोलीस महासंचालक आणि संबंधीत जेल अधिकारी यांच्या परवानगी नंतर संजय दत्तला कैदी हक्कानुसार १४ दिवसांचा फर्लो देण्यात आलाय. असही सांगितलं जातय की या दरम्यान संजय दत्त एका सिनेमाच्या मोठ्या सक्सेस पार्टीत ही सहभागी होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.