कल्याण :कोळसेवाडी येथे काही पोलिसांनी आपल्याला विवस्त्र करुण ठाण्यात मारहाण केली, असा आरोप एका पिडीत महिलेने केलाय. ते एवढ्यावरच थांबलेत नाहीत, तर त्यांनी याची व्हिडिओ क्लिप केल्याचे या महिलेने म्हटलेय.
एका महिलेची तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये विवस्त्र करून मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. कल्याण पूर्वेत शेजारी राहणाऱ्या दोन महिलांमध्ये उसनवारीच्या पैशांवरून वाद झाला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात दोन्ही महिलांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी या दोन्ही महिलांना चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलावले. यावेळी त्यांची पुन्हा येथे हाणामारी झाली. यावेळी पोलिसांनी दोघींनी बाजुला केले. त्यावेळी एका महिलेला पोलीस स्टेशनमध्ये टाकले. प्रकरण मिटविण्याऐवजी काही पोलिसांनी मारहाण केली. अंगावरील कपडे फाडले. याचे मोबाईलवर चित्रिकरण केले, असा आरोप पिडीत महिलेने केलाय.
या घटनेनंतर या महिलेने पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली आहे. यावेळी पिडीत महिलेसमवेत आलेल्या नातेवाईकांनी संबधित पोलिसावर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी महिलेची तक्रार दखल घेतली असून, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकात थोरात यांना चौकशीचे आदेश दिलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.