सत्यम लॉज कारवाई प्रकरण, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली

सत्यम लॉज कारवाई प्रकरणी वर्तक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. गावितांची कंट्रोल रुममध्ये बदली करण्यात आलीय. 

Updated: Dec 3, 2016, 04:02 PM IST
सत्यम लॉज कारवाई प्रकरण, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली title=

ठाणे : सत्यम लॉज कारवाई प्रकरणी वर्तक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. गावितांची कंट्रोल रुममध्ये बदली करण्यात आलीय. 

सत्यम लॉजमध्ये तब्बल 290 अनधिकृत खोल्या सापडल्या होत्या. तरी याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. ठाण्याचे आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या उपस्थितीतच ही कारवाई करण्यात आली. 

आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. सत्यम लॉजसोबत  पाच लेडीज बार, इतर ८ लॉज, २५ ढाबे, १० हॉटेल शेड, २५ गॅरेजेस, ३० फर्निचर शोरूम्स जमीनदोस्त करण्यात आले.