फी भरली नाही म्हणून ३ दिवस बसवलं मुख्याध्यापकांच्या केबीनच्या बाहेर

 कोल्हापुरातील न्यु एज्युकेशन सोसायटीच्या विमल गोयंका इंग्लिश मिडिअम स्कूल प्रशासनानं पाचवीत शिकणा-या विद्यार्थिनीनं फी वेळेत भरली नाही म्हणून तिला मुख्याध्यापकांच्या केबीनच्या बाहेर तीन दिवस खाली बसण्याची शिक्षा देण्यात आली. विशेष म्हणजे याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या झी 24 तासच्या टीमला मुख्याध्यापिकांनी धक्काबुकी केली.

Updated: Jan 4, 2017, 03:36 PM IST
फी भरली नाही म्हणून ३ दिवस बसवलं मुख्याध्यापकांच्या केबीनच्या बाहेर title=

कोल्हापूर : कोल्हापुरातील न्यु एज्युकेशन सोसायटीच्या विमल गोयंका इंग्लिश मिडिअम स्कूल प्रशासनानं पाचवीत शिकणा-या विद्यार्थिनीनं फी वेळेत भरली नाही म्हणून तिला मुख्याध्यापकांच्या केबीनच्या बाहेर तीन दिवस खाली बसण्याची शिक्षा देण्यात आली. विशेष म्हणजे याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या झी 24 तासच्या टीमला मुख्याध्यापिकांनी धक्काबुकी केली.

पाचवीत शिकणा-या रिया विनायक भांबुरे हीन शाळेची फी वेळत भरली नाही म्हणून तिला अशी संतापजनक शिक्षा देण्यात आली. या घटनेनंतर रियाच्या पालकांनी झी मीडियाकडं धाव घेतली. झी मीडिआनं या घटनेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी शाळा प्रशासनाकडं माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शाळेच्या मुख्याध्यापिकांनी अरेरावी करत धक्काबुक्की केली.