अकोला : सहलीसाठी गेलेले ४४ शालेय विद्यार्थी चेन्नईत अडकून पडले आहेत. यात ४ शिक्षकांचाही समावेश आहे. दरम्यान, हे सर्व जण सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुसळधार पावसामुळे चेन्नई आणि लगतच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे या विद्यार्थ्यांना चेन्नईत अडकून रहावे लागले आहे. हे विद्यार्थी खामगाव येथील सेंट अॅन्स शाळेतील आहेत. या विद्यार्थ्यांबरोबर संपर्क झाला असून ते शाळेच्या ४ शिक्षकांबरोबर चेन्नईत सुखरूप आहेत.
२५ नोव्हेंबर रोजी सेंट अॅन्स शाळेची सहल चेन्नई येथे गेली होती. मात्र, त्यानंतरच्या दोन-तीन दिवसांत पडलेल्या पावसाने संपूर्ण चेन्नई आणि परिसर जलमय झाला. त्यामुळे रेल्वे, हवाई सेवा खंडीत झाली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई पाहाणी केली. त्यानी १००० कोटींची मदतही जाहीर केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.