शाळेत हेअरबँड न लावल्यानं अशी शिक्षा दिली जाते...?

शाळेत हेअर बँड न लावल्याने सहावीच्या विद्यार्थिनीला तब्बल १२० उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली. 

Updated: Sep 9, 2016, 06:11 PM IST
शाळेत हेअरबँड न लावल्यानं अशी शिक्षा दिली जाते...? title=

अंबरनाथ : शाळेत हेअर बँड न लावल्याने सहावीच्या विद्यार्थिनीला तब्बल १२० उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली. 

त्यामुळे त्या मुलीची प्रकृती बिघडलीय. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. हा प्रकार अंबरनाथमध्ये मदनसिंग मनवीर सिंग या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडला. 

जेहान शेख असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. जेहानने हेअर बँड न लावल्याचं लक्षात आल्यावर तिला शिक्षिकेनं ६० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. जेहानने ६० उठाबशा काढल्याही पण शिक्षिकेचं लक्ष नसल्याने तिने पुन्हा ६० उठाबशा काढायला लावल्या. 

जेहानच्या पायाच्या मांसपेशी दुखावल्या असल्याने तिला चालणंही मुश्किल झालंय. शाळेला गणपतीची सुट्टी लागल्यामुळे शाळेची प्रतिक्रिया मिळाली नाही.