‘केंद्राकडे मदत कशी मागतात हेही माहित नाही?’

राज्याच्या दुष्काळाच्या नियोजनावर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी टीका केलीय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळं पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा सल्ला पवारांनी दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 29, 2012, 04:33 PM IST

www.24taas.com, पुणे
राज्याच्या दुष्काळाच्या नियोजनावर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी टीका केलीय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळं पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा सल्ला पवारांनी दिलाय.
केंद्राच्या मदतीसाठी आधी दुष्काळ जाहीर करावा लागतो, नंतरच मदत मिळते असं पवारांनी म्हटलंय. केंद्राकडून मदत कशी मिळते याचं राज्य सरकारला विस्मरण झाल्याचा टोला पवारांनी लगावलाय. आणेवारीमुळे दुष्काळाचे वास्तव समोर येत नाही. सध्याची परिस्थिती पाहता १५ सप्टेंबरपर्यंत दुष्काळी मदत मिळणार नाही, असंही पवारांनी सांगितलंय.
वास्तविक, राज्य सरकारनं यापूर्वीच १२३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून केंद्राकडे ३ हजार ७६१ कोटींची मागणी केली होती. पण, निकषांशिवाय मदत द्यायला केंद्र सरकारनं नकार दिला. केंद्राकडे मदत मागताना राज्य सरकारच्या बऱ्याच त्रुटी समोर आल्या होत्या. त्यावरूनच पवार यांनी ही टीका केलीय.