शिवसेनेच्या शीतल सांगळे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदी

शिवसेनेच्या शीतल सांगळे यांची नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 21, 2017, 03:11 PM IST
शिवसेनेच्या शीतल सांगळे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदी title=

नाशिक : शिवसेनेच्या शीतल सांगळे यांची नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली आहे.  नाशिक जिल्हा परिषदेवर वीस वर्षांनी भगवा फडकलाय. तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नयना गावित विराजमान झाल्यायत. नाशिकमध्ये शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला. नाशिकमध्ये शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला.  

जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वाधिक २५ सदस्य निवडून आलेत. त्या खालोखात राष्ट्रवादीचे १८ सदस्य आहेत. तसंच भाजपाचेही १५ सदस्य तर काँग्रेसचे आठ सदस्य होते. सत्ता स्थापण्यासाठी ३७ सदस्यांची आवश्यकता असल्याने सेनेनं आक्रमक भूमिका घेत काँग्रेसला माकपाला आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं.