अकोला : मुंबईत उत्तर भारतियांच्या मेळाव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या कारभारावर केलेल्या टीकेला शिवसेनेनं उत्तर दिले आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
जलयुक्त शिवार ही शिवसेना सरकारला दिलेली योजना असल्याचं म्हटले आहे. शेतकऱ्यांचे कर्जमाफ न करणारे सरकार मल्ल्याचे कर्ज कसे माफ करतेय, असा सवाल सावंत यांनी केला आहे. शिवसेना सत्तेत आहे पण ती सतेच्या हत्तीवर अंकुश ठेवणारी माहूत आहे, असे ते म्हणालेत.
भाजपवर जोरदार टीका करतांना भाजप पाठीत वार करणारा मित्र असल्याचे सावंत म्हणालेत. युती तोडणारे अन शिवसेना सोडणारे सध्या कुठे आहेत, असा खोचक सवालही सावंत यांनी एकनाथ खडसे, छगन भुजबळ आणि नारायण राणे यांचं नाव घेता केला आहे.