कल्याणमध्ये सत्ताधारी शिवसेनेला दणका, शेट्टींचे पद रद्द

अनधिकृत बांधकाम प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी सत्ताधारी शिवसेनेला दणका दिला आहे. 

Updated: Mar 25, 2016, 08:44 AM IST
कल्याणमध्ये सत्ताधारी शिवसेनेला दणका, शेट्टींचे पद रद्द title=

कल्याण : अनधिकृत बांधकाम प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी सत्ताधारी शिवसेनेला दणका दिला आहे. 

अनाधिकृत बांधकाम प्रकरणी वॉर्ड क्रमांक ४२ चे शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचं नगरसेवकपद पालिका आयुक्तांनी रद्द केलंय. 

अनधिकृत बांधकाम प्रकरणी आयुक्तांनी कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीपूर्वी १४ जणांना  नोटीस दिली होती. त्यानुसार ही कारवाई केली गेली.