कल्याण : कल्याण डोंबिवली महापौरपदाच्या उमेदवारीवरून शिवसेनेत घमासान झाल्याचे पाहायला मिळाले. दीपेश म्हात्रेंची उमेदवारी डावलल्यानं उपजिल्हाप्रमुख पुंडलीक म्हात्रे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. दरम्यान, रमेश म्हात्रेही नाराज आहेत. मात्र शिवसेनेत कोणतीही नाराजी नसल्याचा दावा सेनेने केलाय.
अधिक वाचा : केडीएमसीतील युतीचा सत्ता फॉर्म्युला, कोणाकडे किती वर्ष पदे?
कल्याण डोंबिवली महापौरपदाच्या उमेदवारीवरून शिवसेनेत घमासान सुरू झालंय. नगरसेवक दीपेश म्हात्रेंना उमेदवारी न मिळाल्यामुळं शिवसेनेचं उपजिल्हाप्रमुख असलेले त्यांचे वडील पुंडलीक म्हात्रे यांनी पदाचा राजीनामा दिलाय. तर दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रेही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं शिवसेने अडचणीत सापडल्याची चर्चा आहे. जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी मात्र शिवसेनेत नाराजी नसल्याचा दावा केलाय. कोणी हा शोध लावलाय, असे सांगत सेनेत आदेशाप्रमाणे काम चालते. शिवसेनेत कोणीही नाराज नसल्याचे लांडगे म्हणालेत.
अधिक वाचा : केडीएमसी महापौर : शिवसेनेत मोठी नाराजी, उपजिल्हाप्रमुखांचा जय महाराष्ट्र
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजप आणि शिवसेनेनं आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. शिवसेनेकडून राजेंद्र देवळेकर यांनी महापौरपदासाठी तर राजेश मोरे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे शिवसेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळाले.
अधिक वाचा : कल्याण-डोंबिवली महापौर निवडणूक : भाजप उमेदवारांकडून अर्ज दाखल
दरम्यान, भाजपकडून महापौरपदासाठी राहुल दामले यांनी तर उपमहापौरपदासाठी विक्रम तरे आणि विशाल पावसे यांनी अर्ज दाखल केले होते. आता युतीबाबत एकमत झाल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहेत. युतीच्या नव्या सूत्रानुसार ही निवडणूक होणार आहे.
अधिक वाचा : केडीएमसी महापौर : शिवसेनेचे उमेदवार जाहीर, भाजपचा सेनेला प्रस्ताव
तत्पूर्वी ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र कल्याण-डोंबिवलीचा महापौर शिवसेनेचाच होणार असल्याचा निर्धार एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. तर भाजपनं महापौरपदासाठी अडीच-अडीच वर्षाचा प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवलाय. याबाबत अंतिम निर्णय़ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेत यशस्वी तोडगा काढला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.