सनबर्न पार्टीवरून शिवसेनेच्या स्थानिक खासदारांचा गौप्यस्फोट

केसनंद गावात होणाऱ्या सनबर्न पार्टीवरून वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. कारण या पार्टीसाठी सरकारनंच पायघड्या घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिवसेनेचे स्थानिक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याबाबत गौप्यस्फोट केला आहे.

Updated: Dec 27, 2016, 07:31 PM IST
सनबर्न पार्टीवरून शिवसेनेच्या स्थानिक खासदारांचा गौप्यस्फोट title=

पुणे : केसनंद गावात होणाऱ्या सनबर्न पार्टीवरून वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. कारण या पार्टीसाठी सरकारनंच पायघड्या घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिवसेनेचे स्थानिक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याबाबत गौप्यस्फोट केला आहे.

पुण्यातल्या सनबर्न पार्टीला सरकारनंच निमंत्रण दिल्याचं पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्याला फोनवरून सांगितल्याचा दावा खासदार आढळराव पाटील यांनी केला आहे. त्यामुळं सरकारचाच सनबर्न पार्टीला आशीर्वाद असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात खासदार आढळराव पाटील यांनी फोनवरून झी 24 तासला प्रतिक्रिया दिली आहे.