धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीची कुंटनखान्यात विक्री

बिहार राज्यातून आलेल्या एका अल्पवयीन मुलीची कुंटनखान्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

Updated: Nov 4, 2016, 07:56 AM IST
धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीची कुंटनखान्यात विक्री

पुणे : बिहार राज्यातून आलेल्या एका अल्पवयीन मुलीची कुंटनखान्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

ही तरुणी प्रियकर आणि त्याच्या मित्रासोबत मुंबईत आली होती. मात्र एका टोळीने फुस लावून तिला पुण्यातील बुधवार पेठच्या कुंटनखान्यात 30 हजार रुपयांना विकले.

पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील अल्पवयीन पिडीत तरुणीची सुटका करुन या प्रकरणात सहभागी असलेल्या सहा आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान पोलीस याप्रकरणात सहभागी असलेल्या कुंटनखाना चालवणाऱ्या महिलेसह अन्य चौघांचा शोध घेत आहेत.