उल्हासनगरमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांची दुकानदाराला मारहाण

उल्हासनगरमध्ये काही स्थानिक गुंडानी एका दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Updated: Oct 31, 2016, 11:38 PM IST
उल्हासनगरमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांची दुकानदाराला मारहाण title=

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये काही स्थानिक गुंडानी एका दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते असलेल्यांची ही झुंडशाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कॅम्प नंबर 3 मध्ये मुख्य बाजारपेठेत महाराष्ट्र ऑटो पाटर्सचा मालकाला मारहाण करण्यात आली आहे. 15 ते 20 गुंडांनी लाकडी दणक्यानं दुकानदाराबरोबरच दुकानातल्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. मध्यवर्ती पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. मारहाणीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.