सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रेला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. आई भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.
मुंबईतून अनेक चाकरमानी आई भराडी देवीच्या दर्शनासाठी आंगणेवाडीत दाखल झाले आहेत. सामान्यांसह राजकीय नेत्यांनीही आई भराडीदेवीच्या चरणी गाऱ्हाणं मांडलं. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पहाटे साडेपाच वाजता भराडी देवीचं दर्शन घेतलं.
भराडीदेवीच्या दर्शनासाठी भक्तांचा जनसागर उसळलाय. दर्शनासाठी एकूण नऊ रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.