लहान भावाला वाचविताना बहिणीचाही दुर्देवी मृत्यू

जिल्ह्यात भावाला वाचवतांना बहिणीचाही दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रस्त्यावरील उतरणीमुळे सायकलचा ताबा सुटून भाऊ विहीरीत पडला. 

Updated: Jul 6, 2015, 05:31 PM IST
लहान भावाला वाचविताना बहिणीचाही दुर्देवी मृत्यू  title=

अहमदनगर : जिल्ह्यात भावाला वाचवतांना बहिणीचाही दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रस्त्यावरील उतरणीमुळे सायकलचा ताबा सुटून भाऊ विहीरीत पडला. 

आपल्या लहान भावाला वाचविण्यासाठी या चिमुकलीने देखील पाण्यात उडी मारलेली. मात्र चिमुकल्या बहिणीचाही दुर्देवी अंत झाला. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आहे.

येळपणे शिवारातील पोलीसवाडी येथे शनिवारी सकाळी बारा वर्षीय ऋतुजा व नऊ वर्षीय हृषीकेश ही दोघे शेतात आई वडिलांकडे गेले होते. 

आई वडिलांनी त्यांना जाताना जनावरे घरी नेण्यास सांगितले म्हणून जनावरांमागून पायी चालत येत होती आणि हृषीकेश सायकलवरून येत होता. रस्त्यात उतरण लागल्यामुळे सायकलवरील ताबा सुटून तो विहीरीत पडला.

मदतीसाठी कोणीच जवळ दिसत नसल्यामुळे ऋतुजा स्वतःचं आपल्या भावाला वाचविण्यासाठी विहीरीत उतरली. मात्र तिथेच दोघांचा पाण्यात पडून मृत्यू झाला.

मागील महिन्यात ह्याच तालुक्यात बैलगाडी विहीरीत पडून एकाचा असाच मृत्यू झाला होता. विहीरींना कठडे नसल्यामुळे असे प्रसंग वारंवार घडत असल्याचे दिसून येते.

मृतदेह विहीरीतून बाहेर काढल्यावर ऋतुजाने हृषीकेशचा हात घट्ट पकडलेला असल्याचे दिसून आले. बहिण-भावाचे हे प्रेम पाहून गावकऱ्यांचे डोळे पाण्याने भरुन आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.