पाहा व्हिडिओ : बाईकस्वार, वाहतूक पोलिसाची फ्री-स्टाइल हाणामारी व्हायरल

मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात वाहतूक पोलीस आणि बाईकस्वारामध्ये चांगलीच फ्री स्टाईल हाणामारी झाली...

Updated: Nov 25, 2015, 06:19 PM IST

सोलापूर :  मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात वाहतूक पोलीस आणि बाईकस्वारामध्ये चांगलीच फ्री स्टाईल हाणामारी झाली...

या राड्याचं चित्रण चांगलंच व्हायरल झालंय... एका शाळकरी मुलानं या राड्याचं चित्रण केलंय...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल पालकमंत्री देशमुख यांच्या मुलाच्या लग्नासाठी सोलापुरात आले होते... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडथळा होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस सोमनाथ थिटे यांनी बाईकस्वार विश्वनाथ बिराजदारला रोड क्रॉसला थांबवलं...त्यातूनच पोलीस सोमनाथ थिटे आणि बाईकस्वार विश्वनाथ बिराजदारमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

पोलिसांनी आपल्याला मुद्दाम अडवलं आणि आपण विचारणा केल्यास मारहाण केल्याचा आरोप बाईकस्वारानं केलाय...तर मारहाण केल्याच्या आरोपावरून वाहतूक पोलीस सोमनाथ थिटेंवर गुन्हा दाखल झालाय... तर बाईकस्वार विश्वनाथ बिराजदारवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.