सोलापुरात 'मिलेनियम स्क्वेअर' इमारतीचे दोन मजले जळून खाक

सोलापूरमधल्या सात रस्ता इथल्या मिलेनियम स्क्वेअर या पाच मजली इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. या आगीत सोलापूर केबल नेटवर्कचे दोन मजले जळून खाक झालेत. 

Updated: Mar 30, 2015, 08:29 AM IST
सोलापुरात 'मिलेनियम स्क्वेअर' इमारतीचे दोन मजले जळून खाक title=

सोलापूर: सोलापूरमधल्या सात रस्ता इथल्या मिलेनियम स्क्वेअर या पाच मजली इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. या आगीत सोलापूर केबल नेटवर्कचे दोन मजले जळून खाक झालेत. 

पहाटे चारच्या सुमारास ही आग लागली. या मजल्यावर स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर असल्यानं त्याचा स्फोट होवून आग भडकली. या आगीमुळं सोलापूर शहरासह जिल्ह्यात केबल नेटवर्कची सेवा ठप्प झालीये.  शॉर्ट सर्कीटमुळं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.

अथक प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठी वित्तहानी झालीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.