रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना होमग्राऊंडमध्येच एका मागोमाग एक मोठे धक्के बसतायत. रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीच्या काळातच हे धक्के तटकरेंना बसलेयत. ज्येष्ठ नेते विजय कवळे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय.
जिल्हा सरचिटणीस राजा केणी आणि तटकरेंचे खंदे समर्थक जिल्हा परिषद सदस्य नंदु म्हात्रे यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलीय. हे दोघेही लवकरच सेनेत प्रवेश करणारयत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापची आघाडी झालीय.
आघाडीच्या राजकारणात कार्यकर्त्यांना संधीच मिळत नसल्यानं पक्षात मोठी नाराजी आहे. त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला सहन करावा लागतोय. येत्या दोन दिवसात राष्ट्रवादीला आणखी धक्के बसणार असल्याचंही बोलल जातंय.