नालासोपारा: पालघर जिल्ह्यातील नालासोपारा इथं व्यसनाधीन तरुणानं नशेच्या स्थितीत स्वतःच्याच आईवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. घटनेनंतर तरुणानं स्वतःवर चाकूनं वार करुन घेतले.
नालासोपारा इथं भाड्याच्या खोलीत विधवा महिला आणि तिचा २१ वर्षाचा मुलगा असे दोघं जण राहत होते. या महिलेच्या मुलाला अंमली पदार्थांचं व्यसन असून तो बेरोजगार होता. नशेच्या स्थितीत तो तरुण नेहमीच त्याच्या आईचा छळ करायचा. गुरुवारी संध्याकाळपासून संबंधीत मुलगा हा घरी परतला नव्हता. शुक्रवारी संध्याकाळी नशेच्या अवस्थेत तो घरी परतला. यानंतर त्यानं स्वत:च्याच आईवर बलात्कार केला.
पीडितेनं त्याला प्रतिकार केला असता तो आईला घरात कोंडून पळून गेला. सतर्क शेजाऱ्यांनी या सर्व घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी त्या मुलानं स्वत:वर चाकूनं वार करुन घेतले.
पोलिसांनी या नराधम तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.