ठाणे: ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील सुसाईड नोटमध्ये नावं असलेल्या चारही नगरसेवकांचे अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयानं प्रलंबित ठेवले आहेत.
आणखी वाचा - सूरज परमार आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण
सुधाकर चव्हाण यांच्या अर्जावर २९ ऑक्टोबर तर इतर तिघांच्या जामीन अर्जावर ३१ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. अटकेची टांगती तलवार लटकत असल्यानं चौघांनी अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव सुरु केली होती. ठाणे न्यायालयात मंगळवारी या चारही नगरसेवकांचे वकील हजर होते.
दरम्यान खटला चालवण्यासाठी सरकारी वकील राजा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आलीय. राष्ट्रवादीचे पालिकेतील विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नगरसेवक नजीब मुल्ला, मनसेतून निलंबित केलेले माजी स्थायी समिती सभापती सुधाकर चव्हाण आणि काँग्रेसचे माजी गटनेते विक्रांत चव्हाण यांचा शोध पोलीस घेतायेत.
आणखी वाचा - ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक परमार यांची आत्महत्या
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.