पिंपरीत एसटी चालकाला मारहाण, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

प्रवाशांनी एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगारातील चालक, वाहक आणि कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 15, 2017, 01:16 PM IST
पिंपरीत एसटी चालकाला मारहाण, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन   title=

पिंपरी : प्रवाशांनी एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगारातील चालक, वाहक आणि कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

काही स्थानिक नागरिक खासगी वाहन घेऊन नातेवाईकांना एसटी स्टँडवर सोडायला आले होते. यावेळी त्यांनी वाहन नो-पार्किंग क्षेत्रात लावलं होतं. या कारणावरून वल्लभनगर-विटा या एसटी चालकाचा आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. 

यावेळी सगळ्यांनी मिळून एसटी चालकाला मारले. त्यामुळे संतप्त झालेल्या एसटी कर्मचा-यांनी बंद पुकारला. वरिष्ठांनी दखल घेईपर्यंत आणि पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.