पंकजा मुंडेंची सभा सुरु असताना कोसळलं स्टेज

औरंगाबादमध्ये पंकजा मुंडेची सभा सुरु असताना स्टेज कोसळलं आहे.

Updated: Jan 28, 2017, 06:11 PM IST
पंकजा मुंडेंची सभा सुरु असताना कोसळलं स्टेज  title=

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये पंकजा मुंडेची सभा सुरु असताना स्टेज कोसळलं आहे. स्टेजवर क्षमतेपेक्षा नेत्यांची प्रचंड गर्दी झाल्याने स्टेज कोसळलं असल्याचा अंदाज आहे.

वैजापूर तालुक्यात महलगावला सभा सुरु असताना हा प्रकार घडलाय. दरम्यान पंकजा मुंडे सुखरुप असल्याचे समजतय. काही वेळाने सर्व व्यवस्थित करुन पुन्हा सभा सुरु झाली आहे.