सावत्र वडिलांसह आईने दिले चटके, बुटाने बेदम मारहाण

खेळण्यासाठी न सांगता घराबाहेर गेला म्हणून आईने आणि सावत्र वडिलान साडेपाच वर्षाच्या मुलाला कागदाने चटके देऊन लाकडी काठीने आणि बुटाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघड झालीय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 12, 2017, 07:05 PM IST
 सावत्र वडिलांसह आईने दिले चटके, बुटाने बेदम मारहाण  title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : खेळण्यासाठी न सांगता घराबाहेर गेला म्हणून आईने आणि सावत्र वडिलान साडेपाच वर्षाच्या मुलाला कागदाने चटके देऊन लाकडी काठीने आणि बुटाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघड झालीय. 

चिंचवड मधल्या रामनगर मध्ये ही घटना घडलीय. याप्रकरणी आई-वडिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...विराज बालाजी अष्टुळे अस मारहाण झालेल्या मुलाच नाव आहे. 

याप्रकरणी विराज याची आई कोमल बालाजी अष्टुळे हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर, सावत्र वडील किशोर लक्ष्मण बनसोडे याला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाकडेवाडी मधल्या सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी सविता चंद्रकांत दिवटे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय..

विराज घरी न सांगता खेळण्यासाठी बाहेर गेला होता. तो उशिरापर्यंत आला नसल्यामुळे त्याचा आई-वडिलांनी परिसरात शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. विद्यानगर येथे राहणा-या आत्यांच्या घरी तो गेला होता. विराज परत घरी आल्यानंतर चिडलेल्या कोमल आणि किशोर याने विराज याला कागदाने चटके दिले. तसेच लाकडी काठीने, बुटाने बेदम मारहाण केली.

 यामध्ये विराज याच्या पायाला जबर मार लागला असून त्याच्यावर महापालिकेच्या (वायसीएम) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विराज याचे सावत्र वडिल किशोर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पिंपरी पोलीस तपास करत आहेत