तीन अल्पवयीन मुलांकडून झालेल्या हाणामारीत चिमुरड्याचा मृ्त्यू

मुलांच्या हाणामारीत आणि भांडणात एका चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना बेळगावमध्ये घडलीय. 

Updated: Feb 10, 2017, 10:11 AM IST
तीन अल्पवयीन मुलांकडून झालेल्या हाणामारीत चिमुरड्याचा मृ्त्यू   title=

बेळगाव : मुलांच्या हाणामारीत आणि भांडणात एका चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना बेळगावमध्ये घडलीय. 

क्षुल्लक भांडणावरून शाळेत दादागिरी करणाऱ्या तीन मुलांनी केलेल्या मारहाणीत प्रशांत हुलमनी या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. बी. के. मॉडेल शाळेच्या मैदानावर ही घटना घडली. 

सदर घटनेची माहिती शिक्षकांना असूनही त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय. पोलिसांनी आरोपी असलेल्या तीनही गुन्हेगारांना ताब्यात घेऊन बालगुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय.