मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीवर नाव न घेता टीका

सोलापुरातल्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव न घेता जोरदार टीका केली. 

Updated: Feb 10, 2017, 09:21 AM IST
मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीवर नाव न घेता टीका title=

सोलापूर : सोलापुरातल्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव न घेता जोरदार टीका केली. 

जिल्हा बँकेतल्या सत्तेचा वापर करून स्वत:ची मुलंबाळं आणि संस्था मोठ्या केल्या, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केलाय. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्याचे चेअरमन उत्तम जानकार यांचा भाजप प्रवेश मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते.