ठाणे : तुम्ही टॅक्स भरला नाही, तर सरकार काय करेल? मालमत्तेवर जप्ती आणेल किंवा चार नोटीस पाठवेल. पण, तुम्ही कर भरला नाही हे सरकारने दवंडी पिटून संपूर्ण गावाला सांगितले तर? कल्पना करता येत नाही ना? पण, असाच प्रकार घडलाय ठाण्यातील मुंब्रा परिसरात.
बँड-बाजासहीत करवसुली
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी मुंब्रा प्रभाग समितीमध्ये चार विशेष पथकांद्वारे बँड बाजासह करवसुलीसाठी धडक मोहीम राबवण्यात आली.
१ कोटी १७ लाखांची वसुली
या धडक कारवाईत २८५ व्यावसायिक मालमत्ता जप्त करण्यात आल्या. ३८ इमारतींचा पाणीपुरवठा तोडला गेला. विशेष म्हणजे १ कोटी १७ लाख रूपयांची वसुली करण्यात आली, ती पण चक्क आठ तासांत...
उपायुक्त संदीप माळवी, ओमप्रकाश दिवटे, संजय हेरवाडे, कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी यांच्या अधिपत्याखाली ही चार पथके तयार करण्यात आली होती. ही पथके मुंब्रा, कौसा, शीळ, दिवा या ठिकाणी नेमण्यात आली. या चार पथकांद्वारे ही कारवाई करण्यात आली.
मुंब्रा बॅन्डबाजासह करवसुलीची धडक मोहिम 285 व्यावसायीक मालमत्ता जप्त,1.17 कोटीची वसुली,38 इमारतीचा पाणी पुरवठा तोडला pic.twitter.com/IqwG7J8Imu
— Thane Municipal Corp (@thanecityonline) January 28, 2016