पुणेकरांची फसवणूक करणाऱ्या टेम्पल रोज इन्व्हेस्टमेंटला दणका

टेम्पल रोज इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून प्लॉटधारकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या देविदास सजनानीला अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सजनानीला अटक केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 25, 2017, 10:57 PM IST
पुणेकरांची फसवणूक करणाऱ्या टेम्पल रोज इन्व्हेस्टमेंटला दणका title=

पुणे : टेम्पल रोज इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून प्लॉटधारकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या देविदास सजनानीला अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सजनानीला अटक केली.

पाच हजारांहून अधिक प्लॉटधारकांची कोट्यवधींची फसवणूक केल्य़ाचा सजनानीवर आरोप आहे. त्याने टेम्पल रोज इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील पिंगोरी इथे प्लॉट विक्री केली होती. 

ग्राहकांना विकलेल्या प्लॉटची सजनानीने पुन्हा विक्री केली होती. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. झी २४ तासने टेम्पल रोजचा घोटाळा सर्वप्रथम उघड केला होता. टेम्पल घोटाळ्याबाबत झी २४ तासवर वृत्त प्रसिद्ध झाल्यावर प्लॉटधारकांनी पोलिसांकडे धाव घेतली होती.