आराध्याला हृदय मिळावे यासाठी सोशल मीडियावरुन आवाहन

साडे तीन वर्षीय आराध्याला हृदय मिळावं यासाठी सध्या सोशल मीडीयावरुन आवाहन करण्यात येत आहे. पुण्यातही यासाठी रॅली काढण्यात आली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 20, 2017, 08:57 AM IST
आराध्याला हृदय मिळावे यासाठी सोशल मीडियावरुन आवाहन title=

पुणे : साडे तीन वर्षीय आराध्याला हृदय मिळावं यासाठी सध्या सोशल मीडीयावरुन आवाहन करण्यात येत आहे. पुण्यातही यासाठी रॅली काढण्यात आली.

हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेसाठी मोदींना पत्र लिहीणा-या वैशाली यादवने देखील यावेळी अवयव दान करण्याचं आवाहन केलं. दरम्यान गेल्या वर्षभरापासून हृदयविकाराशी सामना करणा-या आराध्याला ह्रदयप्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. मात्र हृदयप्रत्यारोपणासाठी आवश्यक दाता अद्याप तिला मिळालेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर तिला दाता मिळावा यासाठी तिच्या नातेवाईकांच्या वतीनं 'सेव आराध्या' ही मोहीम सुरु करण्यात आलीय.

अवयवदाना विषयी भारतात अजून हवी तितकी जागृती नाहीये त्यामुळे आराध्यासारखे अनेक लहानगे हृदयाच्या प्रतिक्षेत असल्याचं योगेश मुळे यांनी सांगितलं या सगळ्यांसाठी आपण ही मोहिम सुरु केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जनतेला आवाहन करावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.